अर्ज प्रक्रिया महत्वाच्या ठळक बाबी..
– एखाद्या गटात (सर्व्हे नंबरमध्ये) जिरायती दोन एकर जमीन आहे, त्यातील काही गुंठे खरेदी करता येणार नाही
– काही गुंठ्यांची खरेदी करताना त्या सर्व्हे क्रमांकाचा ले-आउट करून त्या गुंठे खरेदीला जिल्हाधिकारी किंवा प्रांताधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी
– ज्या व्यक्तीने प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी तुकड्यांची खरेदी घेतली असल्यास त्याची खरेदी-विक्री करण्यासाठीही घ्यावी लागेल परवानगी land record
– फार वर्षांपूर्वी निर्माण झालेल्या तुकड्याची शासन भूमी अभिलेख विभागामार्फत हद्दी निश्चित होऊन तथा मोजणी होऊन, त्याचा स्वतंत्र हद्द आणि नकाशा तयार झाला असल्यास त्या क्षेत्राच्या व्यवहारासाठी परवानगीची गरज राहणार नाही.
– २० गुंठ्यापेक्षा कमी बागायती व ८० गुंठ्यापेक्षा कमी जिरायती जमिनीची विक्री करताना जिल्हाधिकारी किंवा प्रातांधिकाऱ्यांची परवानगी बंधनकारक
‘अशी’ आहे परवानगीची प्रोसेस
बागायती २० गुंठे तर जिरायती ८० गुंठ्यापेक्षा कमी क्षेत्राची खरेदी करण्यासाठी सुरवातीला साध्या कागदावर पाच-दहा रुपयाचे स्टॅम्प तिकीट लावून प्रांताधिकाऱ्यांकडे अर्ज करावा लागतो. त्यानंतर चेकलिस्ट तयार होते आणि ती प्रांताधिकारी कार्यालयातून संबंधित तालुक्याच्या तहसीलदारांकडे येते. तहसीलदार ते प्रकरण संबंधित मंडलाधिकाऱ्यांकडे पाठवतात. Land record maharashtra
तेथून मंडलाधिकारी लगेचच अहवाल प्रांताधिकाऱ्यांकडे पाठवतात. तत्पूर्वी, शेतकऱ्याला ‘ते क्षेत्र भूसंपादन होणार नाही’ अशी भूसंपादन उपजिल्हाधिकाऱ्यांची ‘एनओसी’ घ्यावी लागते. तसेच ते क्षेत्र वन विभागाच्या ताब्यात नसल्याचाही दाखला घ्यावा लागतो.
तसेच २०१५ रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या अधिसूचनेनुसार ते गाव पाणीटंचाई योजनेत नाही, असाही दाखला आपत्ती व्यवस्थापन कार्यालयातून घ्यावा लागतो. ती सर्व कागदपत्रे मंडलाधिकाऱ्यांना दिल्यानंतर त्यांचा प्रस्ताव प्रांताधिकाऱ्यांकडे जातो आणि काही दिवसातच खरेदी-विक्रीसाठी परवानगी मिळते. Land record