Talathi Bharti: तलाठी जाहिरात अर्ज प्रक्रिया निवड?

भरतीसाठी अर्ज कसा करावा?

तलाठी पदाच्या भरतीसाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांमधून ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज देखील ऑनलाईन पद्धतीने सर्व अटी आणि शर्ती पूर्ण करून भरायचे आहेत. याबाबतची जाहिरात नोटिफिकेशन शासनाच्या https://mahabhumi.gov.in/mahabhumilink या वेबसाईट लिंक वर उपलब्ध आहे. ही जाहिरात महसूल विभागाचे सर्व आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्या वेबसाईटवरही उपलब्ध करून देण्यात आली आहे. दरम्यान भरतीची पदसंख्या आणि आरक्षणाची संख्या याच्यात बदल होऊ शकतो. तसे झाल्यास त्याची माहितीही वेळोवेळी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे, असेही या अधिकाऱ्यांनी सांगितले.

👉जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

कशी होणार निवड प्रक्रिया? :

सरळ सेवा पद्धतीने राज्यस्तरावरून एकत्रितरित्या परीक्षा घेतली जाणार आहे. तलाठी संवर्गाची यादी तयार करताना संबंधित जिल्ह्यात आवश्यक असलेल्या पदांचा विचार करुनच प्रत्येक जिल्ह्याची जिल्हानिहाय स्वतंत्र निवड यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी अर्ज केलेला जिल्हा आणि त्यांना मिळालेले गुण हे त्या त्या जिल्ह्यातील यादीनुसारच गृहीत धरले जातील. सदर उमेदवाराचा अन्य जिल्ह्यातील निवड यादीशी कोणताही संबंध असणार नाही. सर्व निवड झालेल्या उमेदवारांना उपविभाग नेमून नियुक्ती करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना प्रदान करण्यात आल्याचेही या अधिकाऱ्यांनी सांगितले.

👉जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा