सरकार मध्ये सामील होत अजित पवारांनी रविवारी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घतल्यानंतर आज शिंदे-फडणीस सरकारची पहिली कॅबिनेट बैठक पार पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.
👉एक रुपयात पीकविमा भरा स्वयंघोषीत पिकपेरा येथे डाऊनलोड करा
आज पार पडलेल्या या महत्वाच्या मंत्रिमंडळ बैठकीत मराठा, कुणबी विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मराठा, कुणबी विद्यार्थ्यांना परदेशी उच्च शिक्षणासाठी ‘सयाजीराव गायकवाड – सारथी शिष्यवृत्ती’ योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजने अंतर्गत ७५ विद्यार्थ्यांना दरवर्षी शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. यामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे.
👉मंत्रिमंडळ बैठकीतील सर्व निर्णय येथे पहा