State government decesion: मुख्यमंत्र्यांनी घेतले तातडीने महत्वाचे निर्णय शेतकऱ्यांना ६हजार तर १रुपयांत पीक विमा, मंत्रिमंडळाचे निर्णय

State government scheme: शेतकऱ्यांच्या खात्यात ६ हजार रुपये आणि १ रुपयांत पीक विमा, तर घेतले हे महत्वाचे निर्णय वाचा

नमो शेतकरी महासन्मान निधी ही केंद्राच्या पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेसारखीच योजना आहे. या योजनेनुसार पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर महाराष्ट्र सरकार वर्षाला सहा हजार रुपये जमा करेल. केंद्र सरकारकडून दर तीन महिन्याला दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतात. state government scheme

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने अर्थसंकल्पात जाहीर केलेली घोषणा पूर्ण करण्याच्या दिशेनं एक पाऊल पुढे टाकलं आहे. पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारनं नमो शेतकरी सन्मान योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. देवेंद्र फडणवीसांनी अर्थसंकल्प जाहीर करताना याबाबत घोषणा केली होती. आज मंत्रिमंडळाने याला मान्यताही दिली आहे. नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना एका वर्षात ६ हजार रुपये दिले जाणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना पीएम किसानप्रमाणे आता ६ हजार रुपये मिळतील.

👉मंत्री मंडळातील महत्वाचे निर्णय पहा येथे क्लिक करा

एक रुपयात पीक विमा काढला जाणार

राज्यातील शेतकऱ्यांसाठी देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना १ रुपयात पीक विमा देण्याची घोषणा केली होती. शेतकऱ्यांच्या वतीनं पीक विम्याचा हप्ता राज्य सरकार भरणार आहे. या दोन्ही योजनांवर शेतकऱ्यांच्या काय प्रतिक्रिया येते ते पाहावं लागणार आहे. काही शेतकऱ्यांनी या योजनेचं स्वागत करण्यात आलं आहे. नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा फायदा राज्यातील एक कोटी शेतकऱ्यांना होणार असून त्यांच्या खात्यावर अतिरिक्त सहा हजार रुपये जमा होणार आहेत.

👉पीएम कुसूम सोलर पंपाचा कोटा उपलब्ध येथे या वेबसाईटवर करा अर्ज

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये मिळणार असून शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा योजनेचाही लाभ घेता येणार आहे, असं फडणवीसांनी सांगितलं. शेतकऱ्यांसाठी ६ हजारांच्या निधीत आणखी ६ हजारांची भर टाकण्याचा निर्णय झालाय. त्यामुळे आता शेतकऱ्यांना वर्षाकाठी १२ हजार रुपये मिळणार आहेत. याचा फायदा १.१५ कोटी शेतकरी कुटुंबांना होणार आहे. यासाठी राज्य सरकारकडून ६ हजार ९०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं. mantrimandal decesion

👉मंत्री मंडळातील महत्वाचे निर्णय पहा येथे क्लिक करा

Leave a Comment