Tractor scheme: राज्यातील 25 हजार शेतकऱ्यांना मिळणार ट्रॅक्टर, तुम्हीही करा अर्ज

Farm Mechanization : राज्य शासनाची कृषी यांत्रिकीकरण ही संकल्पना कृषी क्षेत्रामध्ये वेगाने अवलंबली जात असून शेतीची पूर्व मशागत, पिकांची लागवड, आंतर मशागत ते पिकांची काढणी याकरिता मोठ्या प्रमाणावर आता यंत्रांचा वापर होऊ लागला आहे. यंत्रांच्या वापरामुळे शेतकऱ्यांचा कामातील वेळ आणि  मजुरी वरील खर्च कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळत आहे.

कृषी यांत्रिकीकरणाला चालना मिळावी याकरिता केंद्र व राज्य शासनाच्या देखील अनेक प्रकारच्या योजना राबविल्या जात असून या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अनुदानावर यंत्रांचा पुरवठा केला जातो. कृषी यंत्रांचा विचार केला तर यामध्ये ट्रॅक्टर हे कृषी यंत्र शेतकऱ्यांच्या अगदी जवळचे असून शेतीची पूर्व मशागत, अंतर मशागत

👉ट्रॅक्टर योजनेत सहभागी होण्यासाठी येथे करा अर्ज

अनेक ट्रॅक्टरचलित यंत्रांसाठी आणि तयार शेतीमाल बाजारपेठेत नेण्यासाठी ट्रॅक्टरचा वापर केला जातो. याच माध्यमातून शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदी करता यावे याकरिता शासनाच्या माध्यमातून अनुदान देण्यात येते. गेल्या काही वर्षाचा विचार केला तर शासनाच्या अनुदानातील ट्रॅक्टरची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्याचबाबतची एक महत्त्वाचे अपडेट आपण या लेखात पाहणार आहोत.

राज्यातील 25 हजार शेतकऱ्यांना मिळणार ट्रॅक्टर

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, राज्यातील 15 लाख 29 हजार शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे अनुदानातील ट्रॅक्टर साठी अर्ज केले आहेत. परंतु शासनाकडे त्याप्रमाणे तेवढा निधी उपलब्ध नसल्यामुळे 2023 ते 24 मध्ये राज्यातील 25000 शेतकऱ्यांना ट्रॅक्टर मिळणार आहे. शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर आता ट्रॅक्टर कडे कल वाढल्यामुळे सन 2022-23 चा विचार केला तर राज्य सरकारने 15000 शेतकऱ्यांना अनुदानातून ट्रॅक्टर दिले आहे.

👉ट्रॅक्टर योजनेत सहभागी होण्यासाठी येथे करा अर्ज

 ट्रॅक्टरकडे शेतकऱ्यांचा कल वाढ
जर सध्या परिस्थिती पाहिली तर खतांच्या किमती प्रचंड प्रमाणात वाढल्या आहेत व त्यासोबतच शेतीच्या मशागतीचा खर्च देखील खूप महागला आहे. शेताची नांगरणी करायची झालं एकर साठी 2000 ते 2200  मोजावे लागतात तसेच टिलर व रोटावेटर साठी एकरी दीड हजार रुपये इतका खर्च शेतकऱ्यांना करायला लागतो. या पार्श्वभूमीवर स्वतःचा ट्रॅक्टर असल्यास इतका खर्च करायची गरज शेतकऱ्यांना भासणार नाही याच दृष्टिकोनातून आता बरेच शेतकरी ट्रॅक्टर खरेदी कडे वळले आहेत.

ट्रॅक्टर खरेदीवर अनुदान
शासनाच्या माध्यमातून ट्रॅक्टर खरेदीसाठी अनुदान दिले जाते व त्या माध्यमातून खुल्या प्रवर्गातील शेतकरी बंधूंना एक लाखांची तर मागासवर्गीय, दिव्यांग, महिला, अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना सव्वा लाख रुपयांचे अनुदान या माध्यमातून दिले जाते. उर्वरित रक्कम शेतकऱ्यांना हप्त्याने भरण्याची सुविधा दिली जाते.

अर्ज एक योजना अनेक
महाडीबीटी पोर्टलवर एक अर्ज केल्यानंतर शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या योजनांचा लाभ दिला जातो. यामध्ये प्रामुख्याने शेततळे तसेच मागेल त्याला ठिबक, मागेल त्याला रोटावेटर अशा अनेक योजनांचा लाभ यामध्ये घेता येतो. याच माध्यमातून कृषी यांत्रिकीकरण उप अभियान व इतर योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अनुदानातील ट्रॅक्टर देखील दिले जाते. महाडीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांनी एक अर्ज केल्यानंतर त्याला संबंधित बाबींचा लाभ मिळेपर्यंत पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता भासत नाही.

👉ट्रॅक्टर योजनेत सहभागी होण्यासाठी येथे करा अर्ज
👉योजना समृद्ध महाराष्ट्राची नवीन अपडेट्स वाचा 

Leave a Comment