Farmer scheme: या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 10 हजार रुपये अनुदान उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मोठी घोषणा
राज्यात सध्या अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकरी आणि तसेच नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आणि तसेच नागरिकांना तातडीने 10 हजारांची मदत करणार असल्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानभवनात केली. Ajit Pawar
राज्यात अनेक ठिकाणी 23 जुलै रोजी राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला होता. यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यवतमाळ, बुलढाणा, वाशीममध्ये मोठे नुकसान झाले आहे. या ठिकाणाहून 110 लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. हवाई दलानेही मदत केली. पाण्याची पातळी वाढल्याने अनेक रस्ते बंद झाले. अशा ठिकाणी बचावकार्य मोहीम करण्यात आले. येथे 30 जणांना वाचवण्यात यश आले आहे. पूर्णा नदीला आलेल्या पुरामुळे 20 ते 25 जण अनेक ठिकाणी अडकले होते. त्यांना बाहेर काढण्यात आले आहे. यासाठी एनडीआरएफ एसडीआरएफची मदत घेण्यात आली होती.
ज्या भागात पुरामुळे जिवीत हानी, मृत्यू झाले आहेत, तेथे मृतांच्या नातेवाईकांना तातडीने चार लाख रुपये देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ज्यांची घरे पाण्याखाली गेली आहेत त्यांना 10 हजार रुपये मदत देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. government scheme
राज्य प्रशासन पुरग्रस्तांच्या पाठीशी असल्याचा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आणि पूरग्रस्त भागात स्वस्त धान्य दुकानातून धान्य पुरवठा सुरू करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त, पूरग्रस्त भागात रोगाचा प्रसार रोखण्यासाठी शुद्ध पाणी आणि स्वच्छता मिळेल अशा सूचना देखील प्रशासनाने दिल्या.
मुख्यमंत्री सन्मान निधी योजनेचा पहिला हफ्ता या शेतकऱ्यांच्या खात्यात येणार