IBPS Recruitment : आयबीपीएस अंतर्गत बँकेत विविध, पदांच्या 8000हून अधिक पदभरती

IBPS Recruitment : बँकेत 8000 हून अधिकची विविध पदभरती येथे करा अर्ज
इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शनने (IBPS) अधिकारी श्रेणीतील I, II, III आणि कार्यालयीन सहायक (बहुविविध) या पदासाठी मोठ्या प्रमाणात पद भरती होणार आहे.

तुम्ही या पद भरतीसाठी पात्र असाल तर लगेच अर्ज करा. पात्र उमेदवारांना या पदासाठी अर्ज करता येईल. या पदासाठी अंतिम मुदतीपूर्वी उमेदवारांनी अर्ज करणे आवश्यक आहे. सध्या या पदासाठी नोंदणी प्रक्रिया सुरु आहे. या पदासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 21 जून 2023 रोजी आहे. ही पदभरती (ibps recruitment) विभागीय ग्रामीण बँकांसाठी होत आहे.

👉जाहिरात पहा अर्ज कसा करावा संपूर्ण माहिती येथे पहा

या संकेतस्थळावर करा अर्ज
आईबीपीएस आरआरबीच्या या पदासाठी केवळ ऑनलाईन अर्ज करता येईल. त्यासाठी उमेदवाराला अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल. ibps.in या संकेतस्थळावर पात्र उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करता येईल. इतर पद्धतीने पाठविलेले अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाही.

निवड प्रक्रिया
या पदासाठी पात्र उमेदवारांची निवड लेखी परीक्षेद्वारे करण्यात येईल. ही परीक्षा ऑगस्ट महिन्यात असेल. या परीक्षेची तारीख अजून पण स्पष्ट नाही. या परीक्षेच्या लेटेस्ट अपडेटसाठी वेळोवेळी या अधिकृत वेबसाईट चेक करत राहा.

अर्ज शुल्क किती भरावे लागेल
या पदभरती प्रक्रियेच्या माध्यमातून ऑफिसर ग्रेड I, II, III आणि ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज) या पदासाठी 8000 हून जणांची निवड करण्यात येणार आहे. सर्वसाधारण उमेदवारांना या परीक्षेसाठी 850 रुपये शुल्क द्यावे लागेल. तर एससी, एसटी, पीडब्ल्यूबीडी, ईएक्सएसएम उमेदवारांना या परीक्षेसाठी 175 रुपये शुल्क अदा करावे लागेल.

👉अर्ज कसा करावा संपूर्ण माहिती येथे पहा

 

Leave a Comment