LPG Gas Cylinder Price : वाढत्या महागाईत दिलासा, गॅस सिलिंडरच्या किमतीत मोठी कपात, पाहा नवे दर

LPG Gas Cylinder Price : महागाईचा सामना करणाऱ्या सर्व सामान्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे.

एलपीजी गॅसच्या दरात मोठी घट झाली आहे. एलपीजी गॅस सिलिंडर कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती कमी केल्या आहेत. सलग दुसऱ्या महिन्यात हा दिलासा मिळाला आहे.

याआधी 1 मे 2023 रोजी व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 172 रुपयांनी कमी करण्यात आली होती. आता गॅसची किंमत 83.5 रुपयांनी कमी करण्यात आली आहे. मात्र, घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही.

👉गॅस सिलिंडर आजचे दर पाहण्यासाठी येथे क्लिक करा

प्रमुख शहरांतील व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती

आज म्हणजे 1 जूनपासून मुंबईत व्यावसायिक गॅस 83.50 रुपयांनी स्वस्त झाल्यानंतर 1808.50 रुपयांवरून 1725 रुपयांना विकला जात आहे. घरगुती गॅस सिलिंडरचा दर 1100 रुपयांवर कायम आहे. दिल्लीमध्ये सिलिंडर 1773 रुपयांना विकला जात आहे.

चेन्नईमध्ये एलपीजीची किंमत 1973 रुपये आहे. कोलकातामध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 1960.50 रुपयांवरून 1875.50 रुपयांपर्यंत कमी करण्यात आली आहे.

👉गॅस सिलिंडर आजचे दर पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment