Pm Kisan yojana: आताची मोठी बातमी आहे ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा तेरावा हप्ता अद्याप मिळालेला नाही आणि त्यानंतर त्यांनी तेरावा हप्ता आणि चौदावा हप्ता खात्यामध्ये येण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने किंवा स्वतः जाऊन केवायसी केलेली असेल, तसेच आपले बँक अकाउंट आधार कार्डशी लिंक संलग्न जोडलेला आहे की नाही किंवा जोडून घेतले असेल तर आता अशा शेतकऱ्यांना तेरावा आणि चौदावा हप्ता दोन्हीही हप्ते या महिन्याच्या शेवट तारखेपर्यंत खात्यामध्ये जमा होणार आहेत. pm kisan yojana
त्यामुळे आता एकूण चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होतील तेरावा हप्ता आणि चौदावा हप्ता ज्या शेतकऱ्यांना तेरावा हप्ता अद्याप मिळालेला नाही अशाच शेतकऱ्यांना आता तेरावा आणि चौदावा मिळून चार हजार खात्यावर वर्ग केले जाणार आहेत. pm kisan scheme
मे महिन्याच्या शेवटी आठवड्यात किंवा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात Pm Kisan पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 14 वा हप्ता सबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे. pm kisan next installment
हा pm kisan योजेनेचा हप्ता जर आपल्याला मिळवायचा असेल तर लाभार्थी शेतकऱ्यांना ज्या बँक खात्यात पीएम किसान योजनेचे 2 हजार रुपये जमा होतात, ते बँक खातं आधार क्रमांकाशी link असणे बंधनकारक करण्यात आलं आहे.
आपल्या राज्यात पीएम किसान योजनेचे एकूण जवळ जवळ 96 लाख 98 हजार लाभार्थी शेतकरी आहेत. व यापैकी जवळपास 12 लाख 91 हजार शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी अजूनही जोडलेले नाहीत. असे उप-आयुक्त कृषीगणना आणि पीएम किसान योजनेचे पथक प्रमुख दयानंद जाधव यांनी अलीकडे सांगितले आहे.
👉PM किसान योजनेच्या 14 वा हप्ता लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
याच त्या जवळ जवळ 13 लाख शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यात pm किसान योजनेचा 14 वा हप्ता आधार कार्ड लिंक नसल्यामुळे जमा केला जाणार नाही असे स्पष्ट निर्देश कृषी आयुक्तालयानं दिलेले आहेत.