PM Kisan : 1 जुलै नंतर 14 वा हफ्ता प्रलंबित प्रक्रिया तात्काळ पूर्ण करा

पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा चौदावा हप्ता लवकरच येणार आहे. त्यापूर्वी लाभार्थी शेतकऱ्यांनी ई-केवायसी करणे गरजेचे आहे. आकडा पहिला तर पुणे जिल्ह्यातील तब्बल ८४ हजार ४२५ शेतकरी पीएम किसान योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. असे राज्यात अनेक जिल्ह्यातील ई केवायसी आणि पोर्टलवर चुकलेली माहिती अपडेट न केल्यास शेतकरी वंचित राहू शकतात.

ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करताना अनेक अडचणी येत होत्या परंतु प्रक्रिया एकदम सरळ सोपी झाली असून देखील प्रलंबित प्रकरणे मोठ्या संख्येने आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याच्या अनुषंगाने केंद्र सरकारने पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना सुरू केली आहे. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी (पीएम- किसान) योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबास योजनेच्या हप्त्याचा लाभ देण्याची कार्यवाही सुरू असून, त्यासाठी लाभार्थ्यांनी तत्काळ केवायसी प्रमाणीकरण करून घेणे गरजेचे आहे.

PM Kisan: शेतकरी सन्मान योजनेसाठी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करा

या योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना २ हजार रुपये प्रति हप्ता या प्रमाणे प्रतिवर्षी ६ हजार रुपये लाभ देण्यात येतो. हा लाभ मिळण्यासाठी केंद्र शासनाने लाभार्थ्यांना ई-केवायसी करणे आणि लाभ जमा करावयाचे बँक खाते आधार क्रमांकास जोडणे बंधनकारक केले आहे. या बाबी पूर्ण झाल्या तरच योजनेचे पुढील हप्ते लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होतील.

ई-केवायसी प्रलंबित असलेल्या लाभार्थ्यांस स्वतः पीएम किसान पोर्टलवरील ‘फार्मर कॉर्नर’मधून किंवा सामाईक सुविधा केंद्रातून ई-केवायसी करण्याची सुविधा उपलब्ध केलेली आहे. लाभार्थ्याने ‘फार्मर कॉर्नर’मधून स्वत: ई-केवायसी करून घेतल्यास त्यास कोणतेही शुल्क राहणार नाही.

सामाईक सुविधा केंद्रातून ई-केवायसी करण्यासाठी प्रती लाभार्थी १५ रुपये शुल्क आकारणी करण्यात येईल. लाभार्थींनी या योजनेच्या लाभासाठी आधार कार्ड, बॅंक पासबुक, मोबाईल क्रमांक या कागदपत्रांच्या आधारे बँकेत जाऊन आपले बँक खाते आधार क्रमांकाशी जोडून डीबीटी सुविधा प्राप्त करून घ्यावी.

 

👉ई-केवायसी केलेल्या शेतकऱ्यांची यादी पहा

ई-केवायसी प्रलंबित राहण्याची कारणे

– काही शेतकऱ्यांचे मोबाईल नंबर आधार कार्डला लिंक नाहीत.

– काही शेतकऱ्यांच्या हाताचे ठसे आधारमध्ये मॅच होत नाहीत.

– एकाच मोबाईल नंबरवरून दोन दोन शेतकऱ्यांनी फॉर्म भरलेले आहेत.

– शेतकऱ्यांना ओटीपी येण्यास अडचण निर्माण होत आहेत.

 

👉ई-केवायसी तात्काळ पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment