Talathi Bharti 2023 : राज्यात 4 हजार 625 जागांसाठी तलाठी पदांची मेगा भरती, जाणून घ्या पात्रता, वेळापत्रक

महाराष्ट्र महसूल विभागाकडून या पदाच्या नोकरीची जाहिरात आज जाहीर करण्यात आली आहे. राज्यभरात 4 हजार 625 पदांची भरती केली जाणार आहे. ज्या उमेदवारांना या तलाठी पदासाठी अर्ज करायचा आहे, ते उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतील.

मुंबई : ज्या उमेदवारांना शासकीय नोकरी करायची आहे आणि जे लोक तलाठी भरतीची वाट पाहत आहेत, अशा उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. तलाठी नोकर भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. महाराष्ट्र महसूल विभागाकडून या पदाच्या नोकरीची जाहिरात आज जाहीर करण्यात आली आहे. राज्यभरात 4 हजार 625 पदांची भरती केली जाणार आहे. ज्या उमेदवारांना या तलाठी पदासाठी अर्ज करायचा आहे, ते उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतील.

 

👉संपूर्ण जाहिरात अर्ज कसा करावा प्रक्रिया येथे पहा

 

43 विविध खात्यांतर्गत भरती होणार

तलाठी हा एक महसूल अधिकारी असतो, जो महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये जमिनीच्या नोंदी ठेवण्यासाठी तसेच सर्वेक्षण करण्याचे जबाबदार असतो. राज्यात गेल्या काही महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेल्या तलाठी भरतीसाठी राज्य सरकारने अखेर आदेश जारी केला आहे. त्यानुसार आता राज्यात 4625 जागांची भरती करण्यात येणार आहे. ही भरती ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात होणार असल्याची माहिती आदेशात देण्यात आली आहे. भरतीची जाहिरात आल्यामुळे या भरतीची वाट पाहणाऱ्या उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. राज्य सरकारने यावर्षी जून ते 15 ऑगस्ट दरम्यान हजारो रिक्त पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. सुमारे 43 विविध खात्यांतर्गत ही पदे भरली जाणार आहेत. देशाच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 15 ऑगस्ट पूर्वी ही पदे भरण्याचा शासनाचा मानस आहे.

तलाठी पदासाठी आदेश जारी

राज्य सरकारने तलाठी पदासाठी भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारच्या महसूल आणि वन विभागाने याबाबतचा एक आदेश नुकताच जारी केला आहे. त्यानुसार राज्यातील रिक्त असलेल्या 4 हजार 625 तलाठी पदांच्या जागा येत्या 17 ऑगस्ट ते १२ सप्टेंबर दरम्यान भरण्यात येणार आहेत. महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागांतर्गत तलाठी क- संवर्गातील 4 हजार 625 रिक्त पदे सरळ सेवा भरतीने भरण्यात येणार आहेत. त्यासाठी राज्याच्या सर्व 36 जिल्ह्यांमध्ये ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. ही परीक्षा 17 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर दरम्यान होणार असल्याची माहिती महसूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

👉संपूर्ण जाहिरात अर्ज कसा करावा प्रक्रिया येथे पहा

 

👉अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

Leave a Comment